रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य दिनानिमित्त रावेर तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तहसीलदार बंडू कपासे यांनी प्रशासकीय कार्यालयात सकाळी ९ वाजता ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमात अप्पर तहसीलदार मयूर कळसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष महेमूद शेख, उमाकांत महाजन, राजेन लासुरकर, अरुण शिंदे यांचाही सहभाग होता.
सर्वांनी एकत्रितरित्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना अभिवादन केले आणि देशाच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचे वचन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रगीत गात राष्ट्रध्वजाला सलामी दिली.