लसीकरण केंद्राची संख्या वाढवावा; भाजपा सरचिटणीस नितीन इंगळेंची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाची लस १८ वर्षावरील व्यक्तींना देण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी शहरात लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे आज गुरूवारी ई-निवेदनाद्वारे केली आहे. 

नितीन इंगळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे पासून १८ वर्षावरीत सर्व व्यक्तींना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. आगोदरच जिल्ह्यात लसीकरणाची परिस्थिती गंभीर आहे. जिल्ह्यात सध्या ४३ लसीकरण केंद्र आहेत. त्याठिकाणी ४५ वर्षाहून अधिक व्यक्तींना लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आता १८ वर्षावरील व्यक्तींना लसीकरणाला परवानगी दिल्याने लस घेण्यासाठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ज्येष्ठ नागरीकांना त्रास होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करून १८ वर्षावरील व्यक्तीना लस देण्यासाठी नवीन लसीकरण सेंटरची उभारणी करून त्याच ठिकाणी अशा व्यक्तींना लस देण्यात यावी. आगोदर असलेल्या लसीकरण केंद्रावर फक्त ४५ वर्षांहून अधिक व्यक्तींनाच लस देण्याची मुभा असावी जेणे करून गर्दी कमी होवून ज्येष्ठ नागरीकांना त्रास होणार नाही. वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करावे असे निवेदनात नितीन इंगळे यांनी नमूद केले आहे.

 

 

Protected Content