पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी यासाठी आ.चिमरणराव पाटील यांनी शासनाकडे मागणी केली होती. यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली होती. आ. चिमणराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.
गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपये वाढ करणे, संपकाळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करणे, या मागण्या मंजूर होणेबाबत मतदारसंघातील कर्मचारी महिलांनी आ.चिमणराव पाटील यांची भेट घेतली होती. या मागणीबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत साहेब यांची आमदार चिमणराव पाटील यांनी ०३ जुलै रोजी भेट घेत या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे ३५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यात आहेत. १४ मार्च, २०२४ रोजी शासन निर्णयानुसार केलेल्या शासन निर्णयामध्ये गटप्रवर्तकांना एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली होती. सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज झाल्या होत्या. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहेत. संपादरम्यान आपण गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये व मा.मुख्यमंत्री महोदयांचा यांच्या सूचनेनुसार त्यात ३ हजार ८०० आणखी भर घालून दहा१० हजार रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करून शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली होती. गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे पंचवीस आशा स्वयंसेविकांवर देखरेख करावी लागते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला २५ दिवस दौरे करून आशांना भेटी देवून त्यांना मार्गदर्शन करावे लागते. त्यांना मिळणारे मानधन हे त्यांच्या प्रवासावर खर्च होते. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यातून रक्कम शिल्लक राहत नाही. तेव्हा गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासह अन्य मागण्या मान्य करून गटप्रवर्तकांच्या न्याय मिळवून देण्याची विनंती यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत साहेब यांचेकडे ०३ जुलै रोजीच्या भेटी वेळी केली होती. त्याअनुषंगाने काल रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत गटप्रवर्तकांच्या प्रवर्तकांचा मानधनात ४ हजारांची वाढ करण्यात आलेली आहे.
गटप्रवर्तकांच्या प्रवर्तकांचा मानधनात ४ हजारांची वाढ करून त्यांचा समस्या जाणून घेऊन न्याय दिल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत साहेब आभार मानले आहेत.