यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील बसस्थानकातून सायंकाळी सुटणारी यावल – विदगाव मार्गे जळगाव बससेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशीची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची ओरड असुन ही बससेवा पुर्वरत करावी प्रवाशांची मागणी करण्यात येत आहे.
यावल आगारातून सायंकाळी ७.३० वाजता सुटणारी यावल ते जळगाव बस गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली असून ही बस जळगाव बसस्थानकाहुन रात्री ८ वाजता सुटल्यावर रात्री ९ वाजता ही बस प्रवाशांना सोडण्यासाठी साकळी गावात येत असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीचे असल्याने साकळी व परिसरातील ग्रामस्य प्रवाशी वर्गातून या बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.
यानिमित्ताने रात्री उशीरापर्यंत अमळनेर-चोपडा येथे गेलेले प्रवाशी किनगाव येथे येतात व किनगाव येथून साकळी, यावल येथे येण्यासाठी प्रवाशांना रात्रीची ऐकमेव बस असल्याने ही बससेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशी वर्गाची विशेष करून महीला व लहान मुल यांची ताराबंळ होत आहे.
कोवीड १९ च्या प्रादुर्भाव हा आता पुर्णपणे हद्दपार झाल्याने सर्वत्र पुर्वीप्रमाणे बस सेवा सुरु करण्यात आल्या असून, मात्र यावल आगारातून यावल-विदगावमार्गे जळगाव बस अद्यापही सुरु झाली नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यावल आगारातून बंद असलेली यावल , जळगाव बस पुरर्वत सुरु करण्यात यावी अशी मागणी होत आहे.