Home राष्ट्रीय देशात ठिकठिकाणी आयकर खात्याचे धाडसत्र

देशात ठिकठिकाणी आयकर खात्याचे धाडसत्र

0
37

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयकर खात्याने आज सकाळपासून मध्यप्रदेश, दिल्ली आणि गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले असून संबंधीतांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

आयकर विभागानं आज पहाटे तीन वाजता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण कक्कड यांच्या इंदूर येथील घरावर छापे टाकले. त्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असून याचीच झाडाघडती घेतली जात आहे. याशिवाय, रातुल पुरी, अमिरा ग्रुप आदींच्या निवासस्थानासह कार्यालयांवरही छापे टाकले. आयकर विभागाची पथके दुपारपर्यंत संबंधीतांची झाडाझडती घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी करण्यात आलेल्या या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound