अमळनेर प्रतिनिधी | गावकऱ्यांनी जागरूक राहत भविष्यातील पाणी टंचाईबाबत खासदार उन्मेश पाटील यांना सांगितलं. त्यानी तात्काळ मारवडकरांना केंद्राच्या ‘जलजीवन मिशन’ या पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात शिफारस पत्र उपलब्ध करून दिले. ते संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने येथील सामाजिक ‘सभागृह लोकार्पण सोहळा’ या कार्यक्रमाला आले होते.
तालुक्यातील मारवड हे गाव लोकसंख्या तसेच क्षेत्रफळाने देखील मोठे येते त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात या गावास मोठया प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.सद्यस्थितीत टंचाई जाणवत नसली तरी भविष्यात हा सामना होऊ नये यासाठी येथील लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील व गावकऱ्यांनी हे बाब खासदार उन्मेश पाटील यांच्या लक्षात आणून दिली. खासदारांनी देखील क्षणाचा विलंब न करता जागेवरच मारवड करांना केंद्राच्या ‘जलजीवन मिशन’ या पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात शिफारस पत्र उपलब्ध करून दिले. ते संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने येथील ‘सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा’ या कार्यक्रमाला आले होते.
खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे नावाचे पत्र देत सदर गावाचा प्रस्ताव मंजूर करून आराखड्यात त्याचा समावेश करावा अशा देखील सूचना या पत्रातून केल्या आहेत. यावेळी माजी आ.शिरीष चौधरी, माजी.आ.स्मिताताई वाघ तसेच पचक्रोशीतील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. दरम्यान खा.उन्मेश पाटील यांनी तात्काळ दखल घेत मारवड गावाची केंद्राचा ‘जलजीवन मिशन’ या योजनेत समावेश संदर्भात शिफारस पत्र मिळाल्याने गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.