पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरात आयोध्याहुन प्रथम तिर्थंकर १००८ श्री भगवान ऋषभ देव यांच्यासह पाच तीर्थकर यांची जन्मभूमी असलेल्या शाश्वत तीर्थ अयोध्या प्रभावना रथाचे पारोळा दिगंबर जैन समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले . अयोध्या ही पाच तीर्थंकरांची जन्मभूमी आहे व तिच्या प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शाश्वत तीर्थ आयोध्या येथून परमपूज्य गणनी प्रमुख आर्यिका श्री 105 ज्ञानमती माताजी यांनी गावोगावी अयोध्या भूमी भगवान ऋषभ सह पाच तीर्थंकर यांचा प्रचार व प्रसार व्हावा. यासाठी पारोळा येथे दिनांक पाच डिसेंबर रोजी शाश्वत तीर्थ आयोध्या प्रभावना रथ सकाळी आठ वाजता येथील श्री 108 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे आयोध्याहुन प्रथम तिर्थंकर 1008श्री भगवान ऋषभ देव यांच्यासह पाच तीर्थकर यांची जन्मभूमी असलेल्या शाश्वत भुमि अयोध्याहून आला होता.
९१ वर्षे माताजींनी प्रचाराचा संकल्प केला आहे प्रत्येक भाविकांनी अयोध्याचे दर्शन व्हावे यासाठी रथ भ्रमण करत आहे. अयोध्येत नवीन आदिनाथ मंदिराचे २ मार्चपासून प्राणप्रतिष्ठा होत आहे. अयोध्याच्या मंदिरासाठी पारोळा येथून तीन भाविकांनी मंदिरात प्रतिमा विराजमान करण्याचे निर्णय घेतला आहे. अयोध्येहून आलेला रथाचे गणपती चौक. रथचौक क्रांती चौक सह शहरातील प्रमुख मार्गावरुन भक्ती भावाने मिरवण्यात आला . या वेळी भाविकांनी उत्साहात दर्शन करुन आरती केली रथावर सौधर्म इंद्र होण्याचा मान महेंद्र सुमनलाल जैन यांना मिळाला तर धन कुबेर होण्याचा मान डॉक्टर भरत वाडीलाल जैन यांना तर प्रथम आरती करण्याच्या मान श्रीमती पुष्पाबाई रूपचंद जैन यांना मिळाला .व पाळणा हलविण्याचा मान श्रीमती शकुंतलाबाई छोटूलालजी यांना मिळाला होता .
या वेळी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थीत होते .