मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील न्हावी येथील गिरिश गोपीनाथ निळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
गिरिश यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, संताजी जगनाडे महाराज हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध आणि आदरणीय संत होते. त्यांच्या जीवनातील घटना आणि उपदेश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनावर आधारित माहिती समाविष्ट करून विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल.