अमळनेर (प्रतिनिधी) सानेगुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेरच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या अकराव्या युवा श्रमसंस्कार छावणीचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. यावेळी दिपक लांबोळे सरांच्या जोरदार जोशपूर्ण गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.
उद्घाटन प्रसंगी मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी , प्राचार्य अरविंद सराफ , अविनाश पाटील, चेतनभाऊ सोनार ,तेजोमयी भालेराव व छावणी प्रमुख श्वेता पाटील उपस्थित होते. अकराव्या युवा श्रमसंस्कार छावणीचे प्रास्ताविक करतांना श्वेता पाटील यांनी शिबीरार्थींचे स्वागत केले. सहा दिवसात शिस्त पाळत पाणी व अन्नची नासाडी न करता आपण सोबत असणार आहोत. तुमचे माणुस म्हणून जगणे जास्तीत जास्त उन्नत व आनंदी रहावे यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच तेजोमयी भालेराव यांनी सानेगुरुजी व्यक्ती व विचार समजून सांगताना सानेगुरुजी यांच्या कृति व बोलणे यात कधीही बदल झाले नाही निष्क्रिय जगणे गुरूजींना मान्य नव्हते.
श्रीपाद जोशी मार्गदर्शनात म्हणाले, सानेगुरुजी यांना शेतकरी कष्टकरी कामगार महीला यांनी सक्षम होणे. हा बलसागर भारत अपेक्षित होता. आपल्याला सानेगुरुजींचा स्वप्नातील भारत समजून घ्यावा लागेल. सत्यासाठी लढणारे नविन झाडे उगवण्याची काम युवा श्रमसंस्कार छावणी करते,असेही ते म्हणाले. अविनाश पाटील असे म्हणाले की, पत्रकार लेखक सेनानी संपादक अनुवादक शेतकरी व कामगार नेते, विद्यार्थी संघटनेचे नेते स्वातंत्र्य सेनानी या रुपातील सानेगुरुजी पोहचविण्याचे काम श्रमसंस्कार छावणीतून केले जाईल. अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी मुलांना अभ्यासावर लक्ष केद्रिंत करण्यासोबत माणुस म्हणून जगण्याचे धडे जरूर घ्या असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रथमेश कोठावदे , सलोनी शिंदे ,यांनी केले.पाहुण्यांचा परीचय रेणुका अजमेर यांनी केला कार्यक्रमाचे आभार दिपक विश्वेश्वर यांनी मानले.