प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

12a118a0 f4d2 418e ac88 272bb1141312

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळ संचलित येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात दानवीर, कर्मयोगी, श्रीमंत प्रताप शेठजी व त्यांच्या पत्नी भागीरथीदेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज (दि.२९)आचार्य स्वामीश्री गोविंददेवगिरीजी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांच्या हस्ते झाले. त्र्यंबकेश्‍वर येथील सागरानंदजी सरस्वती महाराज यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संतश्री प्रसाद महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

सुरवातीला श्रीमंत प्रताप शेठजी व श्रीमती भागीरथीदेवी यांच्या पुतळ्यांचे पूजन व माल्यार्पण करून अनावरण करण्यात आले. त्यानंतर संतांचे शोभायात्रेने नवीन इमारतीच्या प्रांगणात पाहुण्यांचे आगमन झाले. किशोरजी व्यास व उपस्थित संतांनी मंत्रोच्चाराने नवीन इमारतीचे उद्‌घाटन केले. संस्थेच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी स्वागतगीत म्हटले. संस्थेचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात संचालक मंडळाने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचा त्यांनी ऋणनिर्देश केला. किशोरजी व्यास यांनी खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. उत्कृष्ट कार्याबद्दल नीरज अग्रवाल यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी खा.शि.मंडळाला पुतळा भेट देणारे सुभाषचंद्र अग्रवाल (धुळे), महेशकुमार अग्रवाल (धुळे) व स्मारक निर्माणासाठी योगदान देणारे माजी कार्याध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, देणगी देणारे प्रा.डॉ.ललित मोमाया, प्रा.एस.ओ. माळी, प्रा.डॉ.जयेश गुजराथी, प्रा.डॉ.पी.आर. शिरोडे, प्रा.आर.के. अग्रवाल, प्रा.जे.सी. अग्रवाल, वास्‍तुतज्ञ श्री. कुळकर्णी, वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे रमेश पाटील, महंमद मिस्तरी, अभियंता मुस्तफा कलकत्तावाला यांचाही आचार्यांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम,संचालक जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, कल्याण पाटील, हरीभाऊ वाणी, डॉ. बी.एस. पाटील, डॉ.संदेश गुजराथी, संस्थेचे चिटणीस प्रा.डॉ. अरूण कोचर आदी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले तर योगेश मुंदडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थाप्रेमी नागरिक तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content