जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालयातील रासेयो एककच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन प्यारा मिलिटरी १६६ बटालियनचे सैनिक लक्ष्मण तहसीलदार यांच्या हस्ते उमाळे येथील उमामहेश्वर मंदिर आज दि. ४ जानेवारी रोजी करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा प्रमिला कोलते, वि का से सो व्हॉइस चेअरमन समाधान धनगर माजी उपसरपंच विद्यमान ग्रा प सदस्य सुरेशभाऊ कंखरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के बी पाटील माजी सरपंच योगेश खडसे, सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.
लक्ष्मण तहसीलदार यांनी सैनिक भरती साठी करावयाचे प्रयत्न याबाबत त्यांनी त्यांचा अनुभव कथन करून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राजूसर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका ललिता हिंगोनेकर यांनी केले. सीनियर स्वयंसेवक पूजा जाधव हिने आभार मानले. कार्यक्रमासाठी ११५ स्वयंसेवक व १० सीनियर स्वयंसेवक उपस्थित होते.