चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील व.ना. प्राथमिक, वाडीलाल राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात उद्या (दि.२६) सकाळी १०.३० वाजता युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सुशोभित विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
त्या आधी सकाळी ९.०० वाजता पालक-शिक्षक सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जी.जी. चव्हाण, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, चिटणीस राजेश राठोड, प्राचार्य आर.बी. उगले, मुख्याध्यापक एम.डी. बागुल व पर्यवेक्षक एस.एस. पवार यांनी केले आहे.