जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये सराव पेपर वर्ग घेण्यात आले होते. सराव पेपर वर्ग मंगळवार ६ फेब्रुवारी व 13 फेब्रुवारी या दिवशी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्यामार्फत करण्यात आले आहे. आज मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील शिष्यवृत्ती सराव परीक्षा जिल्हा परिषद केंद्र शाळा किन्ही येथे आयोजित करण्यात आली होती.
शिष्यवृत्ती सराव परीक्षा हॉलचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आ.संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे, असे उद्घाटन प्रसंगी आ.संजय सावकारे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी विद्यार्थ्यांकडून शाळेमध्ये शिक्षकांनी जास्तीत जास्त सराव पेपर सोडवून घ्यावे असे आवाहन सर्व शिक्षकांना केले.
सदर कार्यक्रमाकरिता भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी डी धाडी, केंद्रप्रमुख ज्ञानदेव चौधरी उपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी श्रीकृष्ण पाटील, सुनिता डोळे, प्रमोद गांधीले, रहीम सर, साजिद सर, मेघशाम सपकाळे, शारदा पाटील, मनीषा चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. सराव परीक्षे करता किन्ही केंद्रातील परिक्षार्थी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. त्यात मराठी माध्यमाचे २७ व उर्दू माध्यमाचे १० विद्यार्थी उपस्थित होते.