डांभुर्णी गावातील वाल्मिक नगरातील रस्ता कॉंक्रीटीकरणाचे उद्धघाटन

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील वाल्मिकी नगरात बऱ्याच दिवसांपूर्वी वाल्मिकीजयंती निमित्ताने कोळी समाज बांधवांनी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य अरुणा पाटील व माजी सदस्य आर.जी. पाटील यांचे हस्ते वाल्मिकीऋषीं यांचे पूजन करण्यात आले होते.

याप्रसंगी या परिसरात विविध योजने अंतर्गत विकासकामे झाली असून वाल्मिकी ऋषींचा परिसर मात्र विकासा पासून वंचित असल्याने या परिसरात मी कोंक्रेटी करण करणार असल्याचा शब्द माजी सदस्य आर. जी. नाना व अरुणा पाटील यांनी समाज बांधवांना दिला होता. आणी त्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी व वाल्मिकी नगरातील कामाला प्रारंभ करण्यासाठी या ठिकाणी अरुणामाई पाटील यांचे हस्थे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी या कामाला विलंब झाल्याचे खंत व्यक्त करून वैद्यकीय उपचारासाठी दोघ बाहेर असल्याचे आर. जी नाना यांनी समाज बांधवांना सांगितले.आता तब्बेत बरी असल्याने या कार्यक्रमाचा शुभारंभ करून लवकरच आपल्या गटातील उर्वरीत सामाजहिताचे विविध विकास कामे सुरु होणार असल्याची ग्वाही या ठिकाणी देण्यात आली. जिल्हा परिषदच्या माजी सदस्या अरुणामाई पाटील यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केल्याने सर्व डांभुर्णीच्या ग्रामस्थ समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले.

 

आर जी नानांचे सर्वसामान्य व्यक्ती पासुन सर्वांना त्यांचे कार्य व काम करण्याची पद्धत ही सर्वांना माहिती असून नानांच्या या कार्याने अरुणामाई पाटील डांभुर्णी परिसरात फार नावलोकिक होत आहे. डांभुर्णी या गावातील कार्यक्रमा प्रसंगी देवानंद फालक,यतीन चौधरी, दिनेश पवार, शुभम विसवे,महेंद्र कोळी, मुरलीधर कोळी, ग्रामविकास अधिकारी संजय चव्हाण, नवल साठे, सदस्या रेखा कोळी आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content