भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या येथील रेल्वे संग्रहालयातील मिनी थिएटरचे उद्घाटन आज (दि.२४) विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
या थिएटरमध्ये रेल्वेचे जुने पुल, ट्रैक, स्थानक, इंजीन, डबे यांचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत. यावेळी वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता लक्ष्मीनारायण,वरिष्ठ विभागीय अभियंता(समन्वय)राजेश चिखले, रेल्वे रूग्णालयाचे मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. सामंतराय, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता(सामान्य)जी.के.लखेरा, वरिष्ठ मंडल संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी ) प्रदीप ओक, वरिष्ठ विभागीय सिग्नल-दूरसंचार अभियंता निशांत द्रिवेदी, विभागीय वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, रेल्वे स्थानक संचालक जी.आर.अय्यर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.