अमळनेर प्रतिनिधी- गृहमंत्री अनिल देशमुख,जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आमदार असतांना मार्च २०१० मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यासाठी ५५६.३९ लाख खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.१४ मे २०२० अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वास आले होते. या वसाहतीत ५ इमारती असून ४१ घरे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. हे बांधकाम पूर्णत्वास येऊन देखील रहिवासाला परवानगी देण्यास टाळाटाळ होत होती, म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पोलीस अधीक्षक जळगाव व बांधकाम विभाग यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला होता,. यासाठी त्यांनी १५ ऑगस्ट तसेच २ ऑक्टोबर २०२० रोजी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली करायला सुरुवात केल्याने प्रश्न मार्गी लागला आहे.