पाचोरा प्रतिनिधी । येथे स्थानिक विकास आमदार निधीतून १० लाख रुपयांच्या पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील, अविनाश कुडे आदी उपस्थित होते.
नगरदेवळा येथे मुस्लिम कब्रस्थान मध्ये पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभीकरण करण्यात यावे या आशयाचे निवेदन मुस्लिम पंच कमेटी मार्फत आमदार किशोर पाटील यांना देण्यात आले होते. त्याचे उदघाटन आज आमदार किशोर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाने आमदारांचे आभार मानून अद्याप कोणीच आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत तर मतांसाठी आमचा नुसता वापर केला गेल्याची खंत व्यक्त केली. आणि आपण आमच्या समस्यांकडे विकासाच्या दूरदृष्टीने बघत असून नक्कीच याची परतफेड येणाऱ्या निवडणुकीतून करु असे सांगितले. यावेळी मुस्लिम समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक गणी शेठ, हबीब खान हनिफ खान, ग्रामपंचायत सदस्य नूर बेग मिर्झा, वसीम शेख, सादिक बागवान, अन्नू मिर्झा, कादर बागवान, अन्वर शेख, शब्बीर मुल्ला, राईस बागवान, सलीम बेग, शिवनारायन जाधव, सुधाकर महाजन, कृष्णा सोनार, सुनील महाजन, भैया महाजन, अरविंद परदेशी, राजेश जाधव, धनराज चौधरी, रोशन जाधव, सागर जाधव, सोनू परदेशी, कडू पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.