लासुर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेचे उद्घाटन

lasur

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासुर गावात नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने ‘राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस’ शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून कार्यक्रम मोठ्या दिमाखात व वाजत गाजत पार पडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्याचे माजी आ. जगदीश वळवी यांच्या सौजन्याने नियोजित कार्यक्रम दि. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालूका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उत्कृष्ठ नियोजन करीत साऱ्यांची मने जिंकली. या शाखा उद्घाटनाला महाराष्ट्र विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची खास उपस्थिती होती. तसेच गावात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक बौद्धवाडा, खाटीकवाडा, सावता माळी चौक, वाघ वाडा, पंप नगर या भागातील पाच शाखांचे उद्घाटन अनुक्रमे मा. अरूणभाई गुजराथी, माजी आ.जगदीश वळवी, चो.सा.का माजी चेअरमन घनशाम पाटील, पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडा न.प.चे सत्ताधारी गटाचे गटनेते जीवन चौधरी, माजी उपनगराध्यक्ष राजुभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गावात राष्ट्रवादीमय वातावरण निर्मिण झाले होते. गावातील तरुण, अबालवृद्ध, महिला भगिणी यांनी अरुणभाई गुजराथी, जगदीश ‘तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है’, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, शरद पवार साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अश्या घोषणा देण्यात आल्या. शाखा उद्घाटन प्रसंगी लासुर गावातील ग्रामस्थ सुभाष वाघ, अनिल वाघ, रसु माळी, नरेंद्र महाजन, हिम्मतराव महाजन, आर.के.पाटील, शंकर महाजन, चंद्रकांत पाटील, आर.एन.पवार, भास्कर पाटील, नोमीन पटोलिया, कल्याण पाटील, गोकुळ महाजन, चंद्रकांत वाघ, जावरे साहेब सोमनाथ सोनार, जिजाबराव पाटील, दिनकर पवार, श्रावण बाविस्कर, शांताराम सोनवणे, जगदीश मगरे, संजय कुंभार, संजय विसावे, हर्षल वाघ, तुषार पाटील, मुकेश पाटील, अकिलखा पठाण, शरीफ ठोके, मोहसिन पठाण, सुभाष पावरा, बूधा पावरा, मंगला बारेला, हीरालाल बारेला, अनिल बारेला, राजेंद्र महाजन, साहेबराव महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.

Protected Content