जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या निर्देशनानुसार कोरोना लसीकरण जनजागृतीसाठीचे डिजिटल एलईडी रथाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो व क्षेत्रिय लोक संपर्क यांच्या संयुक्त विद्यामानाने जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात कोविड लसीकरण व कोरोना प्रतिबंधात्क करण्यासाठी जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन, डिजिटल चिररथाद्वारे केली जात आहे. या चित्ररथाचे आज १२ एप्रिल रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. १२ एप्रिल ते १ मे दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात जावून जनजागृती करणार आहे.
याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, कोरोना प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हातधुवा या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी जि.प.सदस्य पवन सोनवणे, मोहाडी गावचे सरपंच धिरज सोनवणे, क्षेत्रिय प्रचार अधिकारी प्रदिप पवार, बापु पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक समन्वयक पथनाट्य प्रमुख विनोद ढगे यांनी केले.