पंढरपूर येथे डिंगम्बर महाराज मठाच्या प्रवेशव्द्वाराचे लोकार्पण

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वारकरी संप्रदायात ज्ञान कर्म व भक्ती ही साधनेची द्वारे असून ती व्यापक असून त्याचा विवेकाने वापर करून पंढरपूरमध्ये प्रवेश करावा असे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे थोर विचारवंत चैतन्य महाराज देगलूरकर यांनी प्रतिपादन केले. पंढरपूर येथील डिंगम्बर महाराज मठाचे भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण सोहळा चैतन्यमहाराज व ऍड जयवंत महाराज बोधले यांचे हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज होते. भरकटणारी व्यसनाकडे जाणारी युवक पिढी कायद्याने बदलणार नाही तर त्या आध्यत्मिक संस्कारने बदलतील त्यासाठी तरुणांसाठी ज्ञानेश्वरीचे विचार व ज्ञान प्रसार करण्यासाठी त्यातील संस्कार युवकांना रुजविण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे जनार्दन हरिजि महाराज यांनी सांगितले यावेळी ऍड जयवंत बोधले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व प्रवेशद्वारचे आध्यत्मिक महत्व विषद करून सर्व वक्त्यांनी डिंगम्बर महाराज मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे व सहकारी व विषवस्थ मंडळाने खूप मोठे भक्तनिवास व भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आल्यामुळे पंढरपूर चे वैभवात भर पडली आहे. या कार्यासाठी मंडळाचे अभिनंदन करून कार्याचे कवतुक केले. प्रमुख पाहुणे प्रकाश महाराज जवनजाळ विठ्ठल मंदिर पंढरपूर चे समिती सदस्य भरत महाराज पाटील, धनराज महाराज दुर्गादास महाराज, सारंगधर महाराज सुधाकर महाराज, रमेश महाराज आडविहिकर, कान्हेया महाराज राजपूत, विशाल महाराज खोले, नितीन महाराज, रमाकांत भारम्बये ही सर्व परंपरा प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेची निर्मिती व कामकाज व आध्यत्मिक क्षेत्रात प्रवेशद्वार चे महत्व संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले. संतपूजन उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे सदस्य, सुनील भंगाळे धनंजय चौधरी, अतुल तळले, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, नितीन चौधरी, हिरालाल चौधरी, धनु फिरके यांनी केले. कार्यक्रमास ललिता महाजन, सुमन राणे, शंकूतला पाटील, भैयासाहेब रवींद्र पाटील, निलेश राणे, रमेश भंगाळे, जनार्दन भारम्बये, नरेंद्र चौधरी, हिरेंद्र चौधरी, अशोक महाजन, प्रल्हाद महाजन यासह यावल व रावेर तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन किरण चौधरी यांनी केले. शेखर चौधरी, भूषण नारखेडे, मुकुंद भंगाळे, मुकेश पाटील, भास्कर बॉंडे, सागर चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content