जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद मंडळाचे उदघाटन प्रा. डॉ. योगेश महाले यांच्या हस्ते संपन्न झाले.
‘वक्तृत्व आणि वादविवाद ही साधना आहे. आपल्यातील नेतृत्व गुणांच्या विकासासाठी वक्तृत्व कला अत्यंत आवश्यक आहे. वाचन आणि भाषण सरावाच्या सातत्त्यातून वक्तृत्व कौशल्य विकसित करता येते.’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य के. जी. सपकाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तर पर्यवेक्षक आर. बी. ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कला शाखेचे समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे,प्रा. उमेश पाटील, प्रा. प्रसाद देसाई मान्यवर उपस्थित होते.
वादविवाद समितीचे प्रमुख प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. ईशा वडोदकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रा. योगेश धनगर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.दीपक चौधरी, प्रा. प्रवीण महाजन, प्रा. रूपम निळे, प्रा. राजेश साळुंखे, डॉ.श्रद्धा पाटील, डॉ. श्रद्धा जोशी, प्रा. घनशाम सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
या मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात वक्तृत्व, वादविवाद, अभिवाचन व निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार असून विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले.