यावल प्रतिनिधी | यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करियर कट्टाचे ऑनलाइन उद्घाटन झाले.
भालोद महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. डी .ए .खोब्रागडे यांनी करियर कट्टाचे ऑनलाईन उद्घाटन करून स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा .एम. डी. खैरनार यांनी भूषविले तर प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. ए .पी. पाटील यांनी केले.
डॉ.खोब्रागडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, “स्पर्धा परीक्षेत करिअर करायचे निश्चित केल्यानंतर अभ्यासाचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. एका विषयाचे पूर्ण आकलन झाल्यानंतरच दुसऱ्या विषयाकडे वळायला हवं. झ्यर बुक, मासिक यातून वर्षभरातील विविध घडामोडींचे ज्ञान होते. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी श्रवण ,वाचन, मनन, चिंतन व आकलन या सर्व गोष्टींची गरज असते. त्यांनी पोलीस भरती, आर आर बी, स्टाफ सिलेक्शन, बॅकींग व एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याची सविस्तर माहिती दिली.
“करिअर निवडताना आपली आवड व क्षमता याचा विचार करावा. व्यक्तिमत्व विकास कसा होईल यालादेखील प्राधान्य देणे गरजेचे आहे.” असे उपप्राचार्य प्रा .एम.ङी. खैरनार यांनी सांगितले. डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार करियर कट्ट्याचे समन्वयक डॉ.एस.पी. कापडे यांनी मानले .कार्यक्रमास एकूण ६२ विद्यार्थी हजर होते. तर या कार्यक्रमासाठी डॉ. पी .व्ही. पावरा,प्रा. एस.आर .गायकवाड, डॉ. एच. जी. भंगाळे यांनी सहकार्य केले.