Home Cities अमळनेर युवा दिनी ‘गडखांब’ येथे भाजयुमो शाखेचे थाटात उद्घाटन

युवा दिनी ‘गडखांब’ येथे भाजयुमो शाखेचे थाटात उद्घाटन

0
23

अमळनेर प्रतिनिधी | युवा दिनानिमित्त गडखांब ता.अमळनेर येथे भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष, स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन भैरवी वाघ पलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्मिता वाघ यांच्या हस्ते ग्रंथ वाटप करण्यात आले. भैरवी वाघ यांनी संपूर्ण तालुक्यात गावोगावी व गल्लोगल्ली युवा मोर्चा शाखा स्थापन करण्याचे संकेत दिले. स्मिता वाघ यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.

‘या देशाला भविष्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान, नरेंद्र मोदी हेच आजच्या युवकांसाठी आशास्थान आहेत. तेव्हा जास्तीतजास्त युवकांनी भाजपाच्या प्रवाहात सामील होणे ही काळाची गरज असल्या’चे प्रतिपादन भाजयुमो प्रदेश चिटणीस भैरवी वाघ पलांडे यांनी केले.

तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, महेंद्र पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक गिरिश पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, उपाध्यक्ष हिरालाल पाटील, चिटणीस जगदीश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, विश्वास पाटील, भानुदास पाटील, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, किशोर पाटील, शशिकांत पाटील, नंदू पाटील यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound