पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या दुरदृष्टीने व अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कृषि उत्पन्न बाजार समिती येथे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
कोविंड 19 या संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संक्रमित रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आपल्या परिसरात ही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे .अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मतदार संघातील व परिसरातील मायबाप जनतेवर ही वेळ येऊ नये त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी स्वतः कोरोना संक्रमित असतांना देखिल मतदारसंघातील माय-बाप जनतेसाठी अवघ्या ५ ते ६ दिवसांत २५ आॕक्सिजन व ७५ नाॕन आॕक्सिजन बेड असे एकुण १०० बेडचे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरची उभारणी केली. यात मा.अमोल चिमणराव पाटील यांनी माय-बाप जनतेची कुठेही गैरसोय होऊ, बेड अभावी वणवण होऊ नये, रूग्णांना वेळवर उपचार मिळावे यासाठी अहोरात्र झटत अवघ्या ५ ते ६ दिवसांत सुसज्ज असे १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले.
आज आमदार चिमणराव पाटील यांच्या दुरदृष्टीने व मा.अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कृषि उत्पन्न बाजार समिती ता.पारोळा जि.जळगांव येथे हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मा. नागोरावजी चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अमोल चिमणराव पाटील सोबत उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, महिला पोलीस उपनिरीक्षक दातीर मॅडम, गटविकास अधिकारी एन आर पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत,
तालुका निबंधक कार्यालयाच्या श्रीमती सिंहले मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रांजली पाटील, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आर बी पाटील सर, शहर प्रमुख अशोक भाऊ मराठे, बाजार समितीचे संचालक चतुर भाऊसाहेब पाटील, उपसभापती दगडू बापू पाटील, संचालक मधुकर पाटील, प्रेमानंद भैय्या पाटील, पि.के. पाटील,जिजाबराव पाटील,बी.एन. पाटील सर दीपक पिंगळे बाजार समीतीचे सचिव रमेश चौधरी व मान्यवर उपस्थित होते.