जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमांतर्गत जळगाव शहरातील अहुजा नगरातील वृंदावन परिसर आणि मनुदेवी कॉलनी परिसरात लोकसहभागातून १२ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे होते. तसेच उद्घाटक जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तर प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, परिक्षावधीन अधिकारी सतिश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पीआय महेश शर्मा यांची उपस्थिती होती.
या उपक्रमासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी पुढाकार घेत सर्वांना लोकवर्गणीचे आवाहन करीत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. तर यासाठी मधुकर चौधरी, सदाशिव शिरसाळे,भाऊलाल पाटील, सुरेश चौधरी, प्रकाश पाटील, पितांबर कोळी, बाबासाहेब थोरवे, छोटू पाटील, यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिरसाळे यांनी केले. यावेळी परिसरातील नागरीकांसह आदी उपस्थित होते.