यावल आगारात १० नवीन एसटीचे लोकार्पण; ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’च्या पाठपुराव्याला यश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील एसटी आगारात नव्याने १० एसटी बसेस प्राप्त झाल्या असून लाईव्ह ट्रेन्ड न्युज या वृत्त वाहीनीने केलेल्या पाठलागास अखेर यश प्राप्त झाले असून प्रवाशी नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावलच्या एसटी आगारास बहुप्रतिक्षेनंतर प्राप्त झालेल्या नवीन एसटी बसेसचे पुजन करीत नाराळ फोडून त्यांचे लोकापर्ण करण्यात आले.

भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा पार पडला. पूर्वी आगारात ६१ बसेस होत्या व त्यातील काही बसेस नादुरूस्ती झाल्यानंतर नियमित बसेफेऱ्या करीता तारेवरची कसरत करावी लागायची मात्र, आता नविन बसेस मिळाल्याने आगारातील समस्या सुटली आहे.

यावल येथील एस.टी. आगारात परिवहन मंडळाच्या वतीने व रावेर आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नवीन १० एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. आगारात दोन टप्प्यात या बसेस दाखल झाल्या व या सर्व नवीन बसेस बस लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात भाजपा वैद्यकिय आघाडीचे डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमास सुरवात झाली.

यात भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, वड्री सरपंच अजय भालेराव, भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी, आगार व्यवस्थापक दिलीप महाजन, निलेश गडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हस्ते बस पुजन करण्यात आले.यावल बस आगारा ला महायुती सरकारतर्फे १० नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या त्याबद्दल आगाराकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Protected Content