सावदा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल व रावेर तालुक्यातील वारकऱ्यांच्यावतीने पंढरपूर येथे वै.डिगंबर महाराज चिनावलकर मठ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराचा शुभारंभ सोमवारी १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे थोर साधू संत यांच्याहस्ते होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्षक नरेंद्र वानखेडे यांनी दिली आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे यावल व रावेर तालुक्यातील भाविक वारकरी संप्रदायाचे वतीने वै डिंगम्बर महाराज चिनावलकर मठ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेने पंढरपूर येथे भव्य ४ मजली दोन भक्तनिवास इमारतीचे बांधकाम केले आहे. याठिकाणी नुकतेच भव्य असे मुख्य प्रवेशद्वार चे बांधकाम पूर्ण झाले असून याचा उद्घाटन समारंभ वारकरी संप्रदायाचे थोर साधू संत यांचे शुभहस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी दिली.
कार्यक्रम गुरुवर्य हभप चैतन्य महाराज देगलूरकर व गुरुवर्य जयवंत महाराज बोधले, श्री संत माणकोजी महाराज बोधले यांच्याहस्ते होणार असून प्रमुख वंदनीय संत उपस्थिती म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज प्रकाश महाराज, जवनजाळ सदस्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर रवींद्र महाराज हरणे, भैय्यासाहेब रविंद्र पाटील, डिगंबर महाराज दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते, भरत महाराज पाटील बेळीकर, धनराज महाराज अंजळेकर, शारंगधर महाराज, सुधाकर महाराज कोल्हे, भरत महाराज म्हैसवडीकर, पराग महाराज चोपडे, बेळीकर मठाचे अध्यक्ष रमाकांत भारंबे, विलास महाजन, जगन्नाथ महाराज अंजळेकर, मठाचे अध्यक्ष दीपक चौधरी, देणगीदार सुमन बळीराम राणे, शकुंतला पाटील, विणेकरी भगवान चौधरी खानापूर यांच्यासह सर्व कीर्तनकार व वारकरी संप्रदायाचे मान्यवर उपस्थित राहणार आहे.
सध्या मठात आषाढीवारी महोत्सव सुरू असून यावल व रावेर तालुक्यातील सुमारे दोन हजार भाविक वारकऱ्यांची उपस्थिती लाभली आहे. दररोज हरिपाठ चिंतन कथा, कीर्तन व अन्नदान सुरू आहे. कार्यक्रमास उपस्थित राहनेचे आवाहन अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोले, विश्वस्थ जयराम पाटील, विनायक गारसे, शरद महाजन, अतुल तळेले, धनंजय चौधरी, आशालता तळेले, ललिता महाजन, हरीश अत्तरदे आदींनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी, अशोक महाजन, हिरेंद्र चौधरी, जनार्दन भारंबे, मधुकर बोंडे, रमेश भंगाळे, प्रमोद बढे, भागवत चौधरी, प्रमोद भंगाळे व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.