पश्चिम बंगालमध्ये जमावाने मतदानावेळी ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन तलावात फेकल्या

कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील आठ राज्यांमधील एकूण ५७ मतदारसंघांमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया चालू आहे. मतदानादरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आज पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतली भागात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तलावात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

संतप्त जमावाने येथील एका मतदान केंद्रावर हल्ला करून येथील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हिसकावल्या आणि पाण्यात फेकून दिल्या आहेत. कुलतली यथील बूथ क्रमांक ४० आणि बूथ क्रमांक ४१ वर ही घटना घडली आहे. दरम्यान, पोलेरहाट भागातही हिंसाचार झाला आहे. या हिंसाचारात आयएसएफ आणि सीपीआयएमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. आयएसएफ आणि सीपीआयएमच्या समर्थकांनी दावा केला आहे की, त्यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. दरम्यान, या भागातील हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी पोलेरहाटमध्ये दाखल झाली आहे.

Protected Content