बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सुरक्षेविषयी शासनाचे आदेश पाळा; मनसेचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यात बदलापुर दोन अल्पवयीन शाळकरी मुली व अन्य ठीकाणी शाळकरी अल्पवयीन मुलींवर व महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. विद्यार्थीनींचे पालकांच्या मनात आपल्या मुलींच्या सुरक्षेते बदल भितीचे वातावरण निर्माण झाले असुन राज्यात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावल व परिसरातील शाळा प्रशासनाने विद्यार्थीनींच्या सुरक्षा विषयी शासनाच्या आदेशाचे तात्काळ पालन करीत योजना आखावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्यासह विविध ठिकाणी दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील आठवड्यातील बदलापुर ठाणे या ठीकाणी एका नराधमाने दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याची संतापजनक प्रकार मनसेच्या महीला पदाधिकारी यांच्या दक्षतेमुळे व पाठपुराव्यामुळे उघडकीस आले असून ,दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांना व शाळा प्रशासनास शालेय शिक्षण विभागाला विद्यार्थीनींच्या सुरक्षते बाबत उपाययोजनांचा अध्यादेश तातडीने काढवा लागला असुन, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदधिकारी, कार्यकर्त व अंगीकृत संघटनांच्या वतीने तालुक्यातील विविध शाळा व शाळा प्रशासनास शासनाच्या विद्यार्थीनींच्या सुरक्षते विषयी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यावल यांनी तात्काळ उपाययोजना आखावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कळविण्यात येत आहे .

गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड, गटशिक्षण आधिकारी विश्वनाथ धनके यांच्यासह यावल कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय प्रार्चाया संध्या सोनवणे, साने गुरूजी महाविद्यालय यावल,मुलींची माध्यमीक कन्या शाळा यावल यांना निवेदन दिले आहे. पुढील एक महिन्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाच्या आदेशाची शाळा प्रशासनाने विद्यार्थीनी सुरक्षा संदर्भात काय उपाय योजना आखली याची पाहणी करणार असुन , दरम्यान ज्या शाळा प्रशासनाने उपाययोजना केलेली नसल्याचे आढळून आल्यास आपण त्या शाळा प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवt निर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर चेतन अढळकर, शाम पवार, किशोर नन्नवरे, गौरव कोळी व मुकेश बोरसे यांच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content