राज्यातील २८८ मतदारसंघात ‘इतके’ उमेदवार निवडणूक रिंगणात !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील २८८ मतदारसंघात २९३८ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिमत: ४ हजार १४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. २० तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पंधराव्या विधानसभेसाठी आठ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी ३ वाजता संपली. त्यातील २९३८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अंतिमत: ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

सर्वाधिक ३४ उमेदवार बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघात केवळ ३ उमेदवार आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघात ३३, बीड मतदारसंघात ३१ उमेदवार रिंगणात आहेत. महाड व कुडाळ मतदारसंघात ५ तर बोईसर व धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघात ६ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार २० नोव्हेंबर रोजी त्यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत.

Protected Content