Home राजकीय शिवसेना शाखेत ठाकरे व शिंदे समर्थकांमध्ये राडा !

शिवसेना शाखेत ठाकरे व शिंदे समर्थकांमध्ये राडा !

0
27

डोंबिवली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये अनेकदा तणाव निर्माण झाला तरी संघर्ष झाला नव्हता. आज मात्र डोंबिवलीतल्या मध्यवर्ती शिवसेना शाखेत दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.

डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झालाय. शिंदे समर्थक शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत घुसून शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला, त्यानंतर ठाकरे समर्थकांनी प्रतिकार केल्याने दोन्ही गट एकमेकांना भिडले.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून यातच कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक देखील होणार आहे. या आधीच येथील राजकीय वातावरण तापलेले असतांना आता शिंदे व ठाकरे गटातील संघर्ष थेट हाणामारीवर पोहचल्याने भविष्यात हे वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound