यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने विजयादशमी निमित्ताने आयोजित रावण दहनाचा कार्यक्रम येथील प्रसिद्ध व्यास मंदिरा समोरील हरिता सरीता नदीच्या पात्रात शनिवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक श्रीराम पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, फैजपूर चे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, धनंजय शिरीष चौधरी,प्रभाकर सोनवणे, विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंग, गोपाल दर्जी, यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, अनिल चौधरी, अमोल जावळे, श्रीराम पाटील, धनंजय चौधरी, अन्नपुर्णासींग यांनी म्हटले की, विजयादशमीला श्रीराम प्रभूंनी रावणरूपी दृष्ट प्रवृत्ती चा नाश केला. सद्यस्थितीत महीलावर अत्याचार वाढत आहेत त्यासाठी समाजानेच पुढाकार घेवून रावणरुपी अन्याय-अत्याचारा विरुद्ध समाजालाच पुढे यावे लागेल. याप्रसंगी मान्यवरांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.. याप्रसंगी विविध रंगाच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. भगतसिंग पाटील,उमेश फेगडे, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, विजय पाटील, अमोल भिरूड, चेतन अढळकर, तुकाराम बारी,अभिमन्यु चौधरी , नाना बोदडे, नईम शेख यांच्यासह आदी मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी बालगोपालासह शहरातील हजारो नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले , उपाध्यक्ष हेमंत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल दुसाने ,अरूण लोखंडे , बापु जासुद, यांचेसह श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले .