चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ उत्साहात

चोपडा प्रतिनिधी । येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ आणि ‘कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवसानिमित्त’ व्याख्यान व कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांच्या काव्यगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, प्रा.सौ.एम.टी.शिंदे,  एस.टी.शिंदे, श्री.एस.बी.पाटील,  एम.एल.भुसारे,  पी.आर.पाटील,  डी.डी.कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील,  एस.बी.पाटील, जी.बी.बडगुजर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे यांनी केले.

याप्रसंगी  व्ही.जी.सोनवणे यांचे  ‘मातृभाषा व मराठीचे महत्व’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या  मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, ‘मराठी भाषा ही अमृतासमान गोड, मधुर, रसाळ आहे. तिची सर इतर कोणत्याही भाषेला येणार नाही. माणसांना एका समान धाग्यात गुंफण्याची कला ही मराठी भाषेत आहे. श्रीचक्रधर स्वामींनी मराठीला ‘धर्मभाषा’ असे संबोधले आहे. आपली मराठी तसेच मातृभाषा आपल्या समाजाचे वैभव आहे. मराठी ही आपली मातृभाषा व ज्ञानभाषा असल्यामुळे तिचा सन्मान व जतन करणे आवश्यक आहे.

यावेळी जयश्री साहेबराव महाजन (एम.ए.मराठी) व रुपेश खोंडे (एफ.वाय.बीकॉम) यांनी ‘मराठी माती’, कविता बोरसे (एस.वाय.बी.ए) यांनी ‘कविता’, ज्ञानेश्वर जोशी (एस.वाय.बी.ए.) यांनी “माझी मराठीची बोली”, रविना गुलाब पाटील (एस.वाय.बी.ए)  व  हर्षल दगडू शिंपी (टी.वाय.बी.ए) यांनी ‘कणा’ इत्यादी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण सहभागी विद्यार्थ्यांनी केले.  प्रा.सौ.एम.टी.शिंदे यांनी कुसुमाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांचे सादरीकरण केले व त्या कवितेमधील सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली. विद्यार्थ्यांनी आपली मराठी भाषा व मातृभाषेचे संवर्धन करण्यासाठी आपल्या बोलीचा दैनंदिन व्यवहारात वापर करायला हवा असेही त्या यावेळी आपल्या मनोगताप्रसंगी म्हणाल्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारात कविवर्य कुसुमाग्रजांच्या साहित्याचे मोलाचे योगदान आहे. आपण स्वत: आपल्या मातृभाषेचा वापर करू तेव्हाच तिचे संवर्धन होण्यास मदत होईल.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते.

दरम्यान, म.गां.शि.मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती संत रोहिदास जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.टी. पाटील, डॉ.के.एन.सोनवणे, डॉ.पी.एस.लोहार, व्ही.पी.हौसे, क्रांती क्षीरसागर, माया शिंदे डॉ.एस.ए वाघ, ए.बी.सूर्यवंशी व इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते

 

 

Protected Content