जळगाव (प्रतिनिधी) सीए आयपीसी परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाला असता पाचोरा येथील शंतनू सोनवणे यांनी देशात 49 वा तर राज्यात चौथा क्रमांक पटाकवून जळगावचे नाव पुन्हा उंचावले आहे.
पाचोरा येथील शंतनू रविंद्र सोनवणे हे गेल्या दोन वर्षापासून सीए परिक्षेसाठी अभ्यास करीत होते. गेल्या वेळी त्यांना एक मार्काने हुलकावणी दिल्याने त्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरूवात केली. त्यांना सीए स्वप्नील पटनी, सीए अंकिता पटनी आणि सीए हर्षद जाजू यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेत यश मिळावे यासाठी त्यांनी पुणे आणि जळगाव मार्गदर्शन केले. यावर्षी सीए आयपीसी परीक्षेसाठी देशभरातून 25 हजार 375 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी केवळ 524 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण झाले आहे. एकूण निकाल केवळ 2.17 टक्के लागला. शंतनू सोनवणे यांनी देशात 49 वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला आहे.