पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पहूर पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत सव्वा लाखाची देशी – विदेशी दारू जप्त करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान (एमएच २० ईई ३०९७) या कारची तपासणी केली असता त्यात १ लाख २५ हजार ४३० रुपये किमतीची देशी विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी चालक दिलीप अशोक पाटील, रा. धुळे यास कारसह पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत एकूण मुद्देमाल ७ लाख ७५ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी दिलीप पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, गोपनीय विभाग प्रमुख गोपाल गायकवाड, ज्ञानेश्वर ढाकरे, विनोद पाटील, हेमंत सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.