Home Cities जामनेर सावित्रीबाई फुले विद्यालयात कार्य शिक्षण वस्तू प्रदर्शन उत्साहात

सावित्रीबाई फुले विद्यालयात कार्य शिक्षण वस्तू प्रदर्शन उत्साहात

0
42

पहूर, ता. जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात कार्य शिक्षण वस्तू प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या. पर्यावरण पूरक आकाश कंदील, मातीचे किल्ले, त्यापासून विविध वस्तू प्रदर्शनीत मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनीत श्रावणी लोहार या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला. ममता सोनवणे व मोहिनी सोनवणे यांचा द्वितीय तर अक्षय जाधव याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. ईशा पाटील, वृषभ चौधरी, मोक्षा कोळी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. त्यांना शिक्षक शंकर भामेरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एम. एच. बारी, ए. ए. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.


Protected Content

Play sound