Home क्राईम संभाजी नगरात बंद फोडून मुद्देमाल लांबविला

संभाजी नगरात बंद फोडून मुद्देमाल लांबविला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे तालुक्यातील पाथरी या आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह गेलेल्या पंडित तुळशीराम माळी (ह.मु. संभाजीनगर, जळगाव) यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने रोख ३० हजारांसह साडे नऊ तोळ्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील पाथरी येथील मुळ रहिवासी असलेले पंडित माळी हे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला आहे. त्यामुळे ते कुटुंबीयांसह जळगावातील संभाजीनगर परिसरात राहतात. पाथरी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने ते कुटुंबीयांसह गावी गेले होते. त्या वेळी शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व रोख ३० हजार रुपयांची रक्कम, साडे नऊ तोळ्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता माळी यांच्या पत्नी घरी आल्या. त्यावेळी घटना समोर आली. याप्रकरणी पंडीत माळी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound