मविआत भाकपने केली ‘इतक्या’ जागांची मागणी

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांच्या चर्चा सुरू आहेत. अनेक पक्ष आपल्याला जागा जास्त मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडे १५ जागांची मागणी केल्याची माहिती आहे. नागपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

भाकप आणि इतर डावे पक्षांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाकपने महाविकास आघाडीकडे मुंबईतील सायन कोळीवाडा, ठाण्यातील भिवंडी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, यवतमाळ जिल्ह्याती वणी आणि दारव्हा, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, धुळे जिल्ह्याती शिरपूर, अहमदपगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी, यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम शहर आणि नाशिकमधील नाशिक पूर्व या १५ जागा देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाविकास आघाडीकडून १५ जागा न मिळाल्यास राज्यात काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दर्शवली आहे.

Protected Content