रावेर (प्रतिनिधी) कोलकत्ता येथे डॉक्टरांना झालेली अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ देशभरात आयएमए संघटनेतर्फे आज )(सोमवार) २४ तासाचा बंद पुकारण्यात आला आहे. सोमवारी फक्त अत्यावश्यक सेवा सरू राहणार आहे.
आयएमए संघटनेतर्फे विविध मागण्यासाठी आंदोलन केले जात आहे. त्यात प्रामुख्याने सेवेतील कर्मचाऱ्यांना संरक्षणार्थ कायदे करण्यात यावे, डॉक्टरांवरील हल्ले त्वरित रोखण्यात यावेत, हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, कोलकत्ता येथील हल्ला झालेल्या डॉक्टरांना न्याय मिळावा, पं . बंगाल सरकारने डॉक्टरांची माफी मागावी, या मागण्यांचा समावेश आहे. या बंदमध्ये रावेर शहरातील माऊली हॉस्पिटल,जानकी हॉस्पिटल,समृध्दी हॉस्पिटल,अर्थव हॉस्पिटल,रावेर एक्सरे,ओम सर्जिरकल हॉस्पिटल,सुयोग हॉस्पिटल,संजीवनी हॉस्पिटल,समर्थ हॉस्पिटल,धनवंतरी हॉस्पिटल,श्रीपाद हॉस्पिटल,या हॉस्पिटल आजच्या संपात सहभागी असून कडकडीत बंद ठेवले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी सहापर्यंत एमआरआय, एक्सरे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी अशा सर्व चाचण्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज देशव्यापी संप असून रावेर शहराती अनेक डॉक्टरांनी कडकडीत बंद पाडला आहे. परंतू काही अत्यावश्यक रुग्णांवरच फक्त उपचार सुरु आहेत. तर काही डॉक्टर इतर हॉस्पिटच्या बंदचा फायदा घेऊन गुपचुप ओपीडी करत असल्याचे देखील चित्र आहे.