मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुंबई येथे मंत्रालायात राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.२८ सप्टेंबर २०२२ बुधवार, रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजेच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात तालुक्यातील सारोळा येथे सुमारे ६००.२५ एकर क्षेत्रफळावरील जमिनीवर MIDC (औद्योगिक वसाहत) उभारण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली असून लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई येथे मंत्रालायात राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उद्योग मंत्र्यांनी मुक्ताईनगर मतदार संघासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या MIDC (औद्योगिक वसाहत) च्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला. यानुसार जागेची पाहणी, जागेचे सर्वेक्षण, भू निवड समितीच्या अहवालाचा संपूर्ण तपशील अशा सर्व बाबींचा आढावा घेवून बैठकीत सारोळा ता.मुक्ताईनगर परिसरात सुमारे ६००.२५ एकर (सव्वा सहाशे एकर) क्षेत्र फळावरील जमिनीवर MIDC (औद्योगिक वसाहत) उभारण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली असून लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान मुक्ताईनगर मतदार संघासाठी MIDC (औद्योगिक वसाहत) उभारण्यास तत्वतः मंजुरी मिळाल्याने ऐन नवरात्रीत ही आनंदाची बातमी येवून धडकल्याने सर्वत्र आमदार चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व गुणांचे आभार मानले जात आहेत. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधींशी बोलताना ही बातमी दिली.
दरम्यान , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील वजनदार मंत्र्यांचा नुकताच दि २० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथील दौरा पार पडला. दौऱ्यानिमित आयोजित जाहीर सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघातील बेरोजगारी व कृषी उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मतदार संघात MIDC (औद्योगिक वसाहत) उभारण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे अवघ्या आठ दिवसात मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांनी मुक्ताईनगर मतदार संघाला मोठे गिफ्ट दिले असून मतदार संघासाठी ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.