Home क्राईम पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला


mns vs bjp
 

पनवेल (वृत्तसंस्था) पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी 29 एप्रिल रोजी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. मध्यरात्री 12 वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

 

पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. यावेळी नगरसेवक विजय चिपळेकर हे प्रशांत जाधवला आठ ते दहा गुंडांसोबत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound