पंढरपूरात मंत्री गिरीश महाजनांनी घेतली खानदेशातील वारकऱ्यांची भेट

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी महोत्सव सुरू असून शासनाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन पंढरपूर येथे वारी व्यवस्थापनाकरिता तळ ठोकून आहे. आज १६ जुलै रोजी पंढरपूर येथील डिंगम्बर महाराज चिनावलकर मठास भेट दिली आणि यावल व रावेर तालुक्यातुन आलेल्या वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी झालेल्या सभेत मंत्री गिरीश महाजनांकडे संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी वारी काळातील समस्याबाबत सविस्तर माहिती देताना संस्थेच्या आवारात सभा मंडप उभारणे आवश्यक असून यासाठी निधीची मागणी केली. याबाबत मंत्री गिरीष महाजन यांनी या मठात तत्काळ मोठा सभामंडप उभारणी साठी लागणारा सर्व निधी शासन देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यावेळी व्यासपीठावर महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज, रवींद्र महाराज हरणे विशाल महाराज, दुर्गादास महाराज, भाऊराव महाराज, हिरालालभाऊ चौधरी, निलेश राणे, घनश्याम पाटील, विठ्ठल भंगाळे, किशोर बोरोळे, सुनील भंगाळे, अतुल तलेले उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार व प्रास्ताविक अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केले. अध्यक्ष स्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज होते. सभा मंडप करणारच असा संकल्प गिरीश महाजन यांनी संस्थेच्या मंडळास व उपस्थित वारकरी यांना दिले. यावेळी हजारो वारकरी उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन सहजरित्या वारकऱ्यांच्या मध्ये रमले व सोबत भोजनाचा फोउजदारी डाळ चा येथेच्छ लाभ घेत भर पावसात मंत्री महाजन यांनी भेटी घेतल्या बदल सर्वत्र त्यांचे कौतुक होत होते.

Protected Content