नागपुरात तरुणीला दारू पाजून मित्रांकडूनच सामुहिक बलात्कार

नागपूर (वृत्तसंस्था) मैत्रिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन दोन नराधमांनी एका तरुणीला दारू पाजत सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.

 

पीडित तरुणीची निखिल सोमकुवर या तरुणासोबत मैत्री होती. आरोपी निखिल पीडित तरुणीच्या मामाचाही मित्र होता. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी तिच्या घरी एकटी असताना आरोपी निखिल सोमकुवर तिला घरी भेटायला गेला. त्यावेळी निखिलने पहिल्यांदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

 

आठ दिवसांपूर्वी निखिलने त्याच्या वतन नावाच्या आणखी एका मित्रासोबत पुन्हा पीडित तरुणीचे घर गाठले. निखिल आणि वतन या दोघांनी पीडितेला मद्यपान करायला लावले आणि ती नशेत असताना आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित तरुणीची प्रकृती अचानक बिघडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यासोबत घडलेले प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपी निखिल सोमकुवर आणि वतन गोमकाळे या दोन आरोपींच्या विरोधाचे सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे

Protected Content