लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांचा भारतीयांवर हल्ला

london

लंडन (वृत्तसंस्था)। भारताच्या एअर स्ट्राइकवरून संतापलेल्या पाकिस्तानकडून कुरापती करणे सुरूच आहे. आयएसआय समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्चायोगासमोर पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानुसार आयएसआय समर्थक असलेल्या लोकांनी भारतीय उच्च आयोगासमोर घोषणाबाजी करणाऱ्या मूळ भारतीय असलेल्या लोकांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.

याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती, मात्र चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. काश्मीरी आणि खलिस्तानी समर्थक संघटनांचे लोक भारताविरोधी घोषणाबाजी करीत होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. ओवरसीज पाकिस्तानी वेलफेअर काउंसिल (ओपीडब्ल्यूसी) आणि शीख फॉर जस्टिस गट, आणि ब्रिटन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीमधील लोकांमध्ये यावेळी हाणामारी झाली. या मारहाणीत कोणीही जखमी झाले नाही. एका व्यक्तीला चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Add Comment

Protected Content