जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये ग.स. सोसायटी पतपेढीतर्फे एक प्रेरणादायी आणि गौरवशाली कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सोसायटीच्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या पतपेढीने आपल्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण पुन्हा एकदा ठेवले.

कार्यक्रमात ज्येष्ठ सभासदांना रोख रक्कम ५,००० रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच सभासदांच्या शिक्षणात प्रगती करणाऱ्या गुणवंत पाल्यांचाही गौरव करण्यात आला. शिक्षण, सामाजिक सेवा आणि आर्थिक सहकार्य या त्रिसूत्रीवर आधारित ग.स. सोसायटी पतपेढी अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे, असे गौरवोद्गार यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले.

या कार्यक्रमात ग.स. सोसायटी पतपेढीचे माजी चेअरमन आणि स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह, वर्तमान चेअरमन अजबसिंग पाटील, व्हाईस चेअरमन अमरसिंग पवार, सभासद सुनील सूर्यवंशी, अजय सूर्यवंशी, महेश पाटील, योगेश इंगळे, अजय देशमुख, अनिल गायकवाड यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला हा सोहळा उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.
ग.स. सोसायटी पतपेढीतर्फे घेण्यात आलेला हा सन्मान सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित न राहता, पुढील पिढीला शिक्षणासाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. गुणवंत विद्यार्थी आणि निष्ठावान सभासद यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीसाठी उचललेले सकारात्मक पाऊल होय.



