जळगावात व्यापाऱ्याचे बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू नगरातील बंद घर फोडून घरातून रोकड, चांदीच्या वस्तू आणि दोन मोबाईल असा एकुण २२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र चिंधा पवार वय ४२ रा. नेहरू नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून रोकड, चांदीच्या वस्तू आणि दोन मोबाईल असा एकुण २२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता उघडकीला आले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील हे करीत आहे.

Protected Content