जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भक्कम आघाडी !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ते सातव्या फेरीपर्यंत महायुतीचे दोनही उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ या मोठ्या फरकाने आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान दुपारी १ वाजेच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राक्षताई खडसे यांना २ लाख १९ हजार ७३ अशी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना १ लाख ३२ हजार २९२ मते मिळाली असून या रक्षाताई खडसे या ८६ हजार ७८१ मतांनी आघाडीवर आहे तर दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना २ लाख २९ हजार ४०६ मते मिळाले आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण बाळासाहेब पवार यांना १ लाख २४ हजार ४७ मते मिळाले आहे. यामध्ये स्मिताताई वाघ हे १ लाख ५ हजार ३५९ मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीचे दोनही उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ या आघाडीवर असून आतापर्यंतच्या सर्व फेरीमध्ये या दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने लीड करत असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content