भारतात २०२४ लोकसभा निवडणूकीत ६४ कोटी २० लाख मतदारांनी केले मतदान

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय लोकशाहीचा उत्सव 2024 च्या लोकसभा निवडणुकीतले मतदान पार पडले. एक्झिट पोलचे आकडेही बाहेर आले, उद्या प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. पण त्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजधानीत पत्रकार परिषद घेऊन भारतीय मतदारांनी जागतिक विक्रमाला हात घातले, असे सांगितले. देशात तब्बल 64 कोटी 20 लाख मतदारांनी मतदान केल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. यामध्ये 31 कोटी 20 लाख महिला मतदारांचा समावेश होता. या सर्व महिला मतदारांना आपण उभे राहून सलामी दिली पाहिजे, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आवर्जून सांगितले. भारताने मतदानाचा जागतिक विक्रम नोंदवताना ज्या 64 कोटी 20 लाख मतदारांनी मतदान केले.

देशाच्या प्रचंड निवडणूक कारभारा संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली. निवडणूक आयोगावरचे सगळे आक्षेप त्यांनी पुराव्यांसह खोडून काढले. जगात कुठल्याही लोकशाहीमध्ये 64 कोटी 2 लाख मतदारांनी मतदान केलेले नाही. ते भारतीय मतदारांनी करून दाखवले त्यांनी जागतिक विक्रमाला हात घातला भारतातल्या 2024 पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये देखील एवढे मतदान झाले नव्हते, याकडे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आवर्जून लक्ष वेधले.

सर्वसाधारणपणे निवडणूक आयोग मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत असतो परंतु ही प्रथा तोडून निवडणूक आयोगाने मतमोजणी पूर्वी एक दिवस आधी पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या निवडणुकीत जागतिक विक्रम झाल्याचे सांगितले. जगात प्रथमच 64 कोटी 2 लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जगभरातील कोणत्याही देशात इतक्या विक्रमी संख्येने मतदान झाले नाही. देशातील 31 कोटी 20 लाख महिला मतदारांनी मतदान केले. देशातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने मतदान केले.

Protected Content