धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने धरणगाव शहरात युवासेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी गर्दीतून मोबाईल व पाकीट मारणाऱ्यास नागरीकांना पोलीसांच्या हवाली केले आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आदीत्य ठाकरे हे दौन्यावर असून धरणगाव मतदार संघाच्या धरणगाव शहरात त्याची मोठी सभा होत आहे.
या सभेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरीकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान या गर्दीचा फायदा घेवून मोबाईल व पाकीट मारणारा चोरट्याला नागरीकांनी पकडले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.