यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ९ वर्षाच्या फुलसिंग पहाडसिंग बारेला (रा. विटवे पाडा हिंगोणा तालुका यावल) या मुलाचा मनवेल शाळेत शिक्षण घेतांना चक्कर येऊन पडल्याने दुदैवी मृत्यु झाला होता.
या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा ही अलर्ट झाली असुन आज ९ ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु तडवी व साकळी प्राथमिक केन्द्राच्या आरोग्य अधिकारी स्वाती कवडीवाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष चौधरी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ अरूण पाटील यांच्या पथकाने मनवेलच्या आश्रमशाळेला भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या नियमित होणाऱ्या आरोग्य तपासणीसह स्वच्छता संदर्भात आढावा घेतला व शाळा प्रशासनास विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना देत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे बाबत आरोग्य यंत्रणेला सुचित केल्याची माहीती या वेळी पत्रकारांशी बोलतांना डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.